Illegal Liquor Sale : अवैध दारूविक्रीबरोबरच आता जुगारही जोरात – श्रीजीत रमेशन

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरात दारूविक्रीबरोबरच (Illegal Liquor Sale) आता जुगारही जोरात सुरु आहे. काही पोलिसांच्या आशीर्वादाने गांधीनगर आणि पारशी चाळ परिसरात बेकायदा जुगार सुरू असल्याचा आरोप आरटीआय आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केला आहे.  

Pune : हौशी शेतकरी ! गाईचे डोहाळे जेवण, पैठणी परिधान करून मिरवणूकही काढली

देहूरोड पोलीस कारवाई का करत नाहीत, ही धक्कादायक (Illegal Liquor Sale) बाब आहे. आम्हाला योग्य टीप मिळते आणि पोलीस अधिकारी गुप्तचर अयशस्वी आहेत. देहूरोड पोलिसांचा हा प्रकार संशयास्पद असल्याचे रमेशन म्हणाले. सर्व पुरावे आणि व्हिडीओ संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोज नवनवीन अवैध धंदे उघड होत असल्याने पोलीस ठाणे प्रभारींच्या बदलीची मागणीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.