Pimpri News : ढाबे व हॉटेल मधून अवैध दारू विक्री होत असल्यास पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार

एमपीसी न्यूज : ढाबे व हॉटेल मधून अवैध दारू विक्री होत असल्यास पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. (Pimpri News) अशी माहिती पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे पद्मानाभ शेट्टी यांनी दिली आहे.असोसिएशन चे शिष्टमंडळ नवीन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना हॉटेल्स व रेस्टॉरंट्सच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच भेटणार आहेत.

ते म्हणाले की पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आळंदी रोड, मोशी, चऱ्होली, मॅगजीन चौक दिघी, ट्रान्सपोर्टनगर- निगडी, वाल्हेकरवाडी, काळेवाडी फाटा व इतर ठिकाणी काही हॉटेल्स व ढाबे विना परमिट दारू विकतात. त्यामुळे ज्या हॉटेल्स कडे परमिट आहेत त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत काल हॉटेल बर्ड व्ह्याली, चिंचवड येथे  झालेल्या असोसिएशनच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली.

Pune News : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी शेवटची संधी

तसेच पिंपरी-चिंचवड शहर पूर्वी पुणे पोलीस आयुक्तालायच्या हद्दीत होते. त्यावेळेस हॉटेल्स व रेस्टॉरंट्स रात्री 1.30 वा पर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी होती.(Pimpri News) आता पिंपरी-चिंचवड शहर हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलय हद्दीत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाने हॉटेल्स व रेस्टॉरंट्स साठी वेगळी वेळ निश्चित केली आहे. त्यामुळे आम्ही नवीन पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंट्स यांनाही रात्री 1.30 वा पर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पोलीस आयुकतांकडे करणार असल्याचं पद्मानाभ शेट्टी यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.