Chinchwad : चिंचवड स्टेशनच्या महावीर चौकात ट्रॅफिक सिग्नल कोसळला

एमपीसी न्यूज- पुण्यात होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना झाल्यानंतर आता चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकातील ट्रॅफिकचा सिग्नलचा खांब कोसळला. आज पहाटे चारच्या सुमारास घटना झाल्यामुळे सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. सकाळी आठ वाजेपर्यंत कुणीही अधिकारी याठिकाणी फिरकला नव्हता. सकाळची वेळ असल्याने त्याचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र आता शहरातील ट्रॅफिक सिग्नलच्या खांबांची देखील तपासणी करण्याची वेळ आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.