Chinchwad : संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज – वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी संभाजी भिडे (Chinchwad) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विविध संघटनांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर गुरुवारी (दि. 10) मोर्चा काढला. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

संभाजी भिडे मागील काही दिवसांपूर्वी दिघी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना जे वक्तव्य केले, त्यावर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला. धार्मिक भावना दुखावल्या, महामानवांचा अवमान केला, सामाजिक सलोखा भंग केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.

पोलिसांनी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी विविध संघटनांनी गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. चिंचवड येथील दळवीनगर येथून हा मोर्चा काढण्यात आला.

KD Sonigara : के डी सोनीगरा ज्वेलर्स येथे दागिन्यांच्या खरेदीवर मान्सून धमाका ऑफर

दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलकांना दळवीनगर येथे अडवले. तिथून (Chinchwad)सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, “कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात त्या पूर्ण होतील. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.