Pune : अभाविपच पुणे महापालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या (Pune) स्व. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांना 10 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली. त्या घटनेच्या निषेधार्थ अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पुणे  महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन केले.

यावेळी अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, गाव बसा नहीं, और लुटेरे हाजीर अशी गत या ठिकाणी झाली आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. परंतु काही लाचखोर आधिकारी पैशांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील जागेत भ्रष्टाचार करून त्या जागा विकतात.

Chinchwad : संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा

हा विद्यार्थ्यांवर होणारा अतिशय निंदनीय अन्याय आहे. अशा भ्रष्ट (Pune) कृत्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी.

विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि यामध्ये इतर सहभागी अधिकाऱ्या देखील करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.