Pimpri News : मोशी टोल नाका बंद करा अन्यथा फोडण्यात येईल – सचिन काळभोर 

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे नाशिक हायवे वरील मोशी टोलनाका बंद करा अन्यथा फोडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर(Pimpri News) यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेल पाठवला आहे. 

काळभोर म्हणतात की, “मोशी टोल नाका मुदत संपली म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता. आज पुन्हा राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मोशी टोल नाका सुरू करण्यात आला आहे. मोशी टोल नाका प्रकरणी राज्य सरकारने मुदतवाढ देऊ नये ही नम्र विनंती अन्यथा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना विनाकारण टोल भरावा लागेल.

Pimpri News : रोटरीच्या पुढाकाराने प्रीमॅच्युअर बालकांसाठी 110 बेबी वार्मर मशीन

कोविड रोगामुळे व्यवसाय घडी विस्कटून गेली आहे. त्यात पुन्हा पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना शहरात टोल आकारणी म्हणजे जिझिया कर आकारणी करण्यात आली अशी परिस्थिती निर्माण झाली असून (Pimpri News) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना मोशी टोल नाका या ठिकाणी टोल आकारणी सक्ती करण्यात यावी अन्यथा मोशी टोल नाका फोडण्यात येईल ह्याची राज्य सरकारने नोंद घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.