Pimpri News : रोटरीच्या पुढाकाराने प्रीमॅच्युअर बालकांसाठी 110 बेबी वार्मर मशीन

एमपीसी न्यूज : सध्या समाजात विविध कारणाने प्रीमॅच्युअर बालकाचा जन्म होऊन आरोग्याच्या समस्या सुरवातीच्या काळात तयार होतात. या बालकांना हॉस्पिटल मध्ये NICU आणि बेबी वार्मर मध्ये आवश्यक उष्णता निर्माण करण्यास ठेवावे लागते. (Pimpri News) या सर्व खर्चिक बाबी असतात आणि सरकारी हॉस्पिटल मधील यंत्रणा ही कमी पडते. तेव्हा ही गरज ओळखून कायमच समाजासाठी प्रयत्नशील असणाऱ्या रोटरी मार्फत बेबी वार्मर पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण आणि रायगड जिल्ह्यात 58 रोटरीच्या संस्थांनी सयुक्तिक रित्या ही जबाबदारी घेत तब्बल 110 बेबी वार्मर रोटरी डिस्ट्रिक्ट पुणे मधील विविध भागात देण्याचे नियोजन केले. बेबी वार्मर आणि त्यासाठी आवश्यक इन्व्हर्टर असा तब्बल 45 लाखाचा प्रोजेक्ट तयार करण्यात आला असून त्यासाठी मदतनिधी उभा केला गेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या YCM, तालेरा, जिजामाता, भोसरी, सांगवी, थेरगाव, आकुर्डी अश्या विविध हॉस्पिटल साठी 31 बेबी वार्मर आज महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा डांगे यांच्या कडे रोटरीच्या मार्फत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार यांच्या नेतृत्वाखाली रोटीरच्या सदस्यांच्या उपस्थिती मध्ये सुपूर्त करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने प्रेसिडेंट गणेश बोरा, मेडिकल डायरेक्टर त्रिवेणी हॉस्पिटल चे डॉ. मोहन पवार, वसंत ढवळे, सुभाष वाल्हेकर, रामेश्वर पवार, रोटरीच्या प्रोजेक्ट साठी मदतीचा हात देणारे नारायण वाल्हेकर उपस्थित होते.

Pune : भविष्यात ‘एटीपी 500’ स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री

यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील रोटरीच्या विविध क्लब चे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ निगडीच्या प्रणिता आलूरकर, राम भोसले, नितीन ढमाले, (Pimpri News) अनिल नेवाळे, रवींद्र भावे, संजय प्रधान आणि शहरातील इतर क्लबचे सदस्य आणि प्रेसिडेंट ही उपस्थित होते. CSR प्रोजेक्ट यशस्वी होण्यास संतोष मराठे आणि चारू श्रोत्री ह्यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.