Pune News : विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज  : विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे नवीन लेखकांना लिखाणासाठी प्रोत्साहन मिळावेत्यांच्या मनात दडलेले विषय लोकांसमोर यावे या उद्देशाने (Pune News) निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेअशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन यांनी निवेदनाद्वारे दिली.

विजय पटवर्धन फाऊंडेशनने गेल्या दोन वर्षात सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा, प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा आणि निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा आयोजित करून नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक जाणिवेतून मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक संस्था, नागरिकांच्या सहकार्याने अडचणीत सापडलेल्या कलाकारांना हरतऱ्हेने सहाय्य करीत आहे. निर्मला श्रीनिवास या विनोदी लेखन स्पर्धेद्वारे नवीन लेखकांना संधी मिळावी आणि स्पर्धेच्या माध्यमातून जो निधी जमा होईल त्याचा विनियोग अडचणीतील कलाकारांच्या मदतीसाठी करावा हा स्पर्धा आयोजनामागील उद्देश आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 5 हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास 3 हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास 2 हजार रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रवेश फी नाममात्र 100 रुपये आहे.

Today’s Horoscope 06 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आई आणि वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनिवास पटवर्धन हे विनोदी लेखक होते आणि त्यांची अनेक पुस्तके आणि लेख प्रसिद्ध आहेत. तर निर्मला पटवर्धन या त्यांना लेखनकार्यात मदत करायच्या. म्हणून या स्पर्धा निर्मला श्रीनिवास या नावाने आयोजित करण्यात येत आहेत.

स्पर्धा सर्वांसाठी खुली असून लेखनाला कोणत्याही विषयाचे बंधन नाही. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सलोखा बिघडविणारी अथवा जात, धर्म, प्रांत, भाषा, वेष आदी (Pune News) संवेदनशील मुद्द्यांबाबत वाद निर्माण करतील अशा आशयाची विधाने लिखाणात असू नयेत. मात्र कथा अथवा लेख विनोदी असणे अनिवार्य आहे. लेखन स्किट, एकांकिका किंवा नाटक या स्वरूपात अपेक्षित नाही. 12 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे.

स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारा निधी कलाकारांच्या हितासाठी वापरण्यात येणार आहे. आपली लेखन कला समृद्ध करण्यासाठी आणि कलाकरांच्या अडचणीत त्यांना मैत्रीचा हात देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा. स्पर्धेसंबंधी अभिजित इनामदार (मो. नं. 9329689835) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विजय पटवर्धन यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.