Pune news: पोलीस आयुक्त इन ॲक्शन, पुणे-सातारा रस्त्यावरील दोन कुंटणखाने सील

Commissioner of Police in Action, seals two brothels on Pune-Satara road.

एमपीसी न्यूज- पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी आज पुणे सातारा रस्त्यावर आणि बुधवार पेठेत अवैधरित्या चालणारे दोन कुंटणखाने सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

पुणे-सातारा रस्त्यावरील ‘आयुर्वेद पंचकर्म बॉडी ट्रीटमेंट सेंटर’ याठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू होता. तर बुधवार पेठेतील जुनी इमारत या ठिकाणीही अवैधरित्या वेशा व्यवसाय होता.

हे दोन्ही कुंटणखाने पोलिसांनी सील केले होते. याठिकाणी पुना वेश्या व्यवसाय सुरू होऊ नये यासाठी स्वारगेट आणि फरासखाना पोलीस स्टेशन च्या वतीने हे कुंटणखाने सील बंद करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता.

हा प्रस्ताव आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी त्यांना मिळालेल्या अधिकारानुसार हे कुंटणखाने सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.