Corona Vaccine : भारत बायोटेकच्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मंजुरीसाठी शिफारस

एमपीसी न्यूज – भारत बायोटेकनं बनवलेली पहिल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालिन वापराच्या मंजुरीसाठी शिफारस केली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या कोविड-19 आजारासाठी बनवलेल्या विशेषज्ज्ञांच्या समितीने आज (शनिवारी) ही शिफारस केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) लसीच्या आपत्कालिन वापराच्या मंजूरीसाठी डीसीजीआयकडे शिफारस केली आहे. कोव्हॅक्सिनच्या वापरासाठी शिफारस करण्यात आली असली तरी अद्याप याला मंजुरी देण्यात आलेली नाही.

दरम्यान, देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज सीरमच्या कोरोना लशीचं ड्राय रन पार पडलं. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविडशिल्डला आत्पत्कालिन वापरासाठी आज संध्याकाळी मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<