CRIC Katha: क्रिकेटप्रेमींना लिहण्याची सुवर्णसंधी, ‘क्रिक कथा’ दिवाळी अंक येणार वाचकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज :क्रिकेट विषयी आवड असणाऱ्या क्रिकेटप्रेमींना लिहण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. (CRIC Katha) यंदा ‘क्रिक कथा’ हा दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला येणार आहे.

 

Monsoon League: मान्सुन लीग क्रिकेट स्पर्धत गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाचा सलग दुसरा विजय; निंबाळकर वॉरीयर्सची विजयी कामगिरी !

 

तुम्हाला लिहायला आवडत असेल तर तुम्हाला क्रिकेटविषयी भन्नाट किस्से लिहता येणार आहेत. यामध्ये क्रिकेट विषयी तुम्हाला हवा तो किस्सा मराठी भाषेत 500 ते 750 शब्दात लिहून  [email protected]  या मेलवर पाठवायचा आहे.(CRIC Katha) तसेच अधिक माहिती नागरिकांना हवी असेल तर त्यासाठीही या मेल आयडीवर संपर्क साधता येणार आहे.

तुमचा प्रत्येक लेख CRICकथा वेबसाईटवर नक्की दिसणार आहे. (हा अंक डिजीटल व प्रिंट दोन्ही स्वरूपात असणार आहे. यामध्ये 3 सर्वोत्कृष्ट लेखांचा समावेश CRICकथा च्या ‘डिजिटल’ अंकात केला जाईल. या 3 विजेत्यांचा रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. हे लेख 30 सप्टेंबर 2022 पर्यंत नागरिकांना पाठता येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.