Monsoon League: मान्सुन लीग क्रिकेट स्पर्धत गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाचा सलग दुसरा विजय; निंबाळकर वॉरीयर्सची विजयी कामगिरी !

एमपीसी न्यूज: स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील 30-30 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत (Monsoon League) राशी व्यास या मुलींच्या कामगिरीमुळे गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया ब संघाने सलग दुसरा तर, निंबाळकर वॉरीयर्स संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत पहिला विजय मिळवला.

 

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत राशी व्यास या मुलीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया ब संघाने खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा 8 गडी राखून सहज पराभव केला.पहिल्यांदा खेळताना खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव 56 धावांवर गडगडला. गॅरी कर्स्टन संघाच्या राशी व्यास हिने 9 धावात 3 गडी बाद करून प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला खिंडार पाडले. (Monsoon League) याशिवाय समवेद गायकवाड (3-5), जीवितेश कदम (2-7) आणि सिध्दांत गुप्ता (2-11) यांनीही चमकदार गोलंदाजी केली. रिशी पेशकर (नाबाद 19 धावा) आणि राशी व्यास (15 धावा) यांच्या फलंदाजीमुळे गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाने हे आव्हान 15.1 षटकात सहज पूर्ण केले.

 

 

Mobile app Launch: “पीसीईटी – नूतनचे एमएचटी सीईटी मॉक टेस्ट” मोबाईल अप्लिकेशन लाँच

 

अर्जुन चेपे याच्या अष्टपैलू खेळीमुळे निंबाळकर वॉरीयर्स संघाने सनराईझ क्रिकेट स्कूलचा पराभव करून स्पर्धेत पहिला विजय नोंदविला. सनराईझ क्रिकेट स्कूलने पहिल्यांदा खेळताना 110 धावा जमविल्या. (Monsoon League) यामध्ये आयुश मोरे (25 धावा) आणि अर्जुन सादगळे (20 धावा) यांनी धावांचे योगदान दिले. निंबाळकर वॉरीयर्सने हे आव्हान 6 गडी राखून पूर्ण केले. अर्जुन चेपे (नाबाद 40 धावा) आणि ओम मालुसरे (39 धावा) या दोघांनी 129 चेंडूत 88 धावांची सलामीची भागिदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला आणि संघाने सहज विजय मिळवला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
खेल क्रिकेट अ‍ॅकॅडमीः 18.5 षटकात 10 गडी बाद 56 धावा (प्रज्वल कांगरे 7, अवांतर धावा 21, राशी व्यास 3-9, समवेद गायकवाड 3-5, जीवितेश कदम 2-7, सिध्दांत गुप्ता 2-11) पराभूत वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया बः 15.1 षटकात 2 गडी बाद 57 धावा (रिशी पेशकर नाबाद 19, राशी व्यास 15); सामनावीरः राशी व्यास

सनराईझ क्रिकेट स्कूलः 28.3षटकात 10 गडी बाद 110 धावा (आयुश मोरे 25, अर्जुन सादगळे 20, अर्जुन चेपे 2-21, मल्हा गोरे 2-17) पराभूत वि. निंबाळकर वॉरीयर्सः 30 षटकात 4 गडी बाद 111 धावा (अर्जुन चेपे नाबाद 40 (77, 3 चौकार), ओम मालुसरे 39, शौनक राजे 1-5);(भागिदारीः अर्जुन आणि ओम यांच्यात पहिल्या गड्यासाठी 88 (129); सामनावीरः अर्जुन चेपे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.