Dehu news : देहू- आळंदी येथे अवैध वृक्षतोड, नागरिकांची नाराजी

एमपीसी न्यूज :  देहू- आळंदी बी.आर.टी रोड कडेला लावलेल्या मोठ्या वृक्षांची अवैध वृक्षतोड होत असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वृक्षतोडीबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आळंदी देहू बी आर टी रोड य़ेथील सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने तसेच ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वृक्षारोपण केले आहे. त्या वृक्षांची वाढ सुद्धा छान झाली आहे. त्यासाठी महापालिकेने फार कष्ट घेतले त्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त ,अधिकारी ,कर्मचारी वर्गाचे अभिनंदनही केले आहे.

या वृक्ष लागवडी मध्ये वड, पिंपळ, बदाम, गुलमोहर, काही शोची वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे रस्त्याचे व परिसराचे सौंदर्य वाढले आहे.(Dehu news) नागरिकांना या मोठ्या झालेल्या वृक्षांमुळे सावली मिळते परंतु याच वाढलेल्या वृक्षांची सरेआम कत्तल केली जात आहे.

Pune crime : मार्केट यार्ड येथे भरदिवसा गोळीबार करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

प्रशासन या वृक्षतोडीकडे गांभीर्याने पाहत नाही, डोळेझाक करीत आहे असे दिसून येते. याबाबत परिसरातील स्थानिक नागरिक गोरक्षनाथ घिगे ,राजू साकोरे ,विनायक घिगे ,सिद्धू बाळोजी ,विठ्ठल घारे ,दादा दिवटे तुकाराम साकोरे ,सचिन पवार ,पाडेकर मामा ,भानुदास सस्ते ,जे के दुर्गाडे ,देविदास कौठाळे ,संभाजी कुदळे ,युवराज सस्ते ,बोडखे विवेकानंद पोपट काळे अमृत दिघे, सुभाष दंताळ, मकरंद बिरारी, मनोज गुप्ता , केशव काळदाते , केशव उगले , ह भ प कुरकुटे महाराज ,विशाल कासार ,सचिन जयस्वाल ,संजय बंडगर ,रमेश हांडे ,सुभाष सातपुते व अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे चेअरमन वेदिक वीजडंम् एज्युकेशनल ट्रस्ट चे संस्थावक अध्यक्ष प्रा राजेश सस्ते नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. या वृक्षांची कत्तल कोण व का करतय याची चौकशी करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

नागेश्वर थत्ते म्हणाले की, ऑसटिया बिल्डिंग, चौधरी ढाबा, हॉटेल जीवन व इतर ठिकाणच्या जवळ वृक्षतोड करण्यात आली आहे. मोशी मधील भारतमाता चौकपासून ते डुडुळगाव पर्यंत बीआरटी रोडच्या दोन्ही बाजूला झाडे तोडण्यात आली आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूच्या झाडांच्या फ़ांद्या अजुनही तिथेच पडलेले आहेत.(Dehu news) रस्त्याच्या उजव्या बाजूची झाडे काही दिवसांपूर्वी तोडलेली आहेत. आम्हाला हे तोडलेले वृक्ष दररोज मॉर्निंग वॉकला जात असताना पाहताना खूप दुःख होते.

याबाबत सुभाष इंगळे, उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा यांना विचारले असता त्यांनी अवैध वृक्षतोड संदर्भात चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.