Congress : पं. जवाहरलाल नेहरू आणि आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Congress) वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त शहराध्यक्ष अरविंद शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना उल्हास पवार म्हणाले की, पं. जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होतेच. पंरतु, थोर स्वातंत्र्य सेनानी देखील होते. आयुष्यातली 11 ते 13 वर्षे त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढताना तरूंगात घालवली. यावेळी त्यांच्या पत्नी आजारी असताना देखील देशाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिले.

त्याचबरोबर नेहरूंचे संपूर्ण कुटूंब हे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत देशाला आधुनिक तंत्रज्ञानाकडे घेऊन जाण्याचा पाया त्यांनी रचला. लहान मुलांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते व मुले आवडीने त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणायचे.

Dehu news : देहू- आळंदी येथे अवैध वृक्षतोड, नागरिकांची नाराजी

अशा या थोर स्वातंत्र्यसेनानी व देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना विनम्र अभिवादन. आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीकारक घडवून दिले. त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांचा यात समावेश होतो. मुलींच्या व बहुजनांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या महात्मा फुल्यांना त्याकाळी काही ठराविक समाजाच्या लोकांनी त्रास द्यायचे काम केले. त्यावेळेस लहुजी वस्ताद यांनी त्यांच्या अंगरक्षकाची भूमिका बजावली.’’

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे रविंद्र म्हसकर यांनी पं. नेहरूजींची गाणी सादर केली (Congress) आणि त्यांना शशिकांत बिबवे, लतेंद्र भिंगारे, सरोजनी काटे यांनी साथ दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगीता तिवारी, द. स. पोळेकर, अविनाश अडसूळ, रमेश सोनकांबळे, हरिदास अडसूळ, अनिस खान, ज्योती परदेशी, चैतन्य पुरंदरे, प्रल्हाद खेसे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.