Pimpri Corona Update : शहरात आज केवळ 2 नवीन रुग्णांची नोंद; 6 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या (Pimpri Corona Update) रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. शहराच्या विविध भागातील केवळ 2 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 72 हजार 533 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 84 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 84 ही रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Congress : पं. जवाहरलाल नेहरू आणि आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त अभिवादन

तर, महापालिका रुग्णालयामध्ये आज एकही रुग्ण (Pimpri Corona Update) दाखल नाही. आज दिवसभरात 30 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 87 हजार 866 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.