Alandi enchroachment : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदी मध्ये अतिक्रमणे हटविण्यास सुरवात

एमपीसी न्यूज : आळंदी येथे सोमवारी आळंदी नगरपरिषद अतिक्रमण विभाग व विशेष प्रशासन पथकामार्फत रस्त्यावरील तसेच फुटपाथवरील अवैध अतिक्रमाणांवर (Alandi enchroachment) कारवाई करण्यात आली. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आलेली आहे.

नगरपरिषदेच्या हद्दीतील देहूफाटा रस्ता, नदीपलीकडील दर्शनबारी लगत असणारा फुटपाथ, प्रदक्षणा रस्ता,मरकळ रस्ता या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावरील हातगाड्या, फूटपाथवरील टपऱ्या इ.ठिकाणी अतिक्रमणे हटवण्यासाठी अतिक्रमण विरोधी कारवाई केली गेली आहे. शहरात उर्वरित भागांमध्येही अतिक्रमणाची कारवाई करण्यात येणार आहे.

Congress : पं. जवाहरलाल नेहरू आणि आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त अभिवादन

कार्तिकी यात्रे वेळी आळंदी शहरातील रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी होत असते. रस्त्यावरील,फुटपाथवरील अतिक्रमणा मुळे तिथे अरुंद रस्ता किंवा अरुंद जागा राहू नये. (Alandi enchroachment) त्यामुळे कुठलीही अनुचित घटना(चेंगराचेंगरी) होऊ नये. याची दक्षता घेत येथील रस्त्यावरील हातगाड्या,फुटपाथवरील दुकाने, टपऱ्या यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याचे कार्य प्रशासना मार्फत चालू झाले आहे.याबाबतची माहिती आळंदी नगरपालिकेचे कर्मचारी कामगार नेते अरुण घुंडरे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.