Fort making competition : शिवमुद्रा युवा मंच आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवमुद्रा युवा मंच आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ (Fort making competition) रविवार 13 नोव्हेंबर रोजी कडोलकर कॉलनीतील लायन्स क्लबच्या हॉलमध्ये पार पडला शिवमुद्रा युवा मंचचे यंदा स्पर्धेचे दहावे वर्षे होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना मशाल पेटवून करण्यात आली. त्यानंतर स्पर्धकांनी पोवाडे गीत सादर केले त्यानंतर तुषार भेगडे,विनय दाभाडे यांचे भाषण झाले व स्पर्धकांनी मनोगत व्यक्त केले आमदार सुनील आण्णा शेळके यांचे भाषण झाले. आमदार शेळके म्हणाले युवा मंचचा उपक्रम हा खूप उल्लेखनीय व चांगला आहे किल्ल्यांचा स्पर्धा या अशाच घेण्यात याव्या. सर्व तरुण मंडळांनी सहकार्यांनी दरवर्षी असचे किल्ले बनवावे युवा मंचला जी काही मदत लागेल ती करण्याचा शब्द त्यांनी दिला. सर्व स्पर्धकांचे त्यांनी कौतुक केले.

Alandi enchroachment : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदी मध्ये अतिक्रमणे हटविण्यास सुरवात

मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, मा. शिक्षण मंडळ सभापती ब्रिजेंद्र भाई किल्लावला, गिरीश बाबा चौरे, विलास शेठ काळोखे तुषार भेगडे, संतोष एकनाथ शेळके, (Fort making competition) अमित भेगडे, विनय दाभाडे, गणेश निसाळ, नितीन खळदे, आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते

स्पर्धेत परीक्षणाचे काम सचिन शेडगे व निलेश गराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री कांबळे यांनी केले स्वागत प्रतीक दाभाडे यांनी केले प्रास्ताविक अभिषेक गदादे यांनी मांडले . आभार दिनेश हेंद्रे व सोहेल पठाण यांनी मानले.

 

हिरोजी इंदुलकर पुरस्कार

फ्रेंड्स क्लब /किल्ले मुल्हेर

 *खुला गट सांघिक*

*प्रथम क्र*. यशवंत ग्रुप / पन्हाळगड

*द्वितीय क्र*. शौर्य ग्रुप (तुकाराम नगर) /लोहगड

*तृतीय क्रमांक* – बनेश्वर शाखा ग्रुप / लोहगड

  *खुला गट वयक्तिक* 

*प्रथम क्रमांक* – युवराज पारगे /राजगड

*द्वीतीय क्रमांक* अथर्व लांडगे /जंजिरा

*तृतीय क्रमांक* -ओंकार वारिंगे /तिकोना

 

  *महिला / मुली गट*

*प्रथम क्रमांक* – विषाल रेसीडन्सी/पद्मदुर्ग

*द्वितीय क्रमांक*- तारा पवार / सिंधुदुर्ग

*तृतीय क्रमांक*- साक्षी कुंभार सोमाटणे/ लोहगड

 

 *15 वर्षा खालील (सांघिक )*

*प्रथम क्रमांक*- धर्मवीर बाल ग्रुप

*द्वितीय क्रमांक* – श्रीनगरी मित्र मंडळ – राजगड

*तृतीय क्रमांक* कृष्णा जबडे मित्र परिवार हॅपी सिटी

 

 *15 वर्षाखालील (वयक्तिक )*

*प्रथम क्रमांक*- प्रणव राजेश सुर्यवंशी / प्रतापगड

*द्वितीय क्रमांक* – जय पाटील वराळे /सिंहगड

*तृतीय क्रमांक* – आकाश जगताप सोमाटणे /प्रतापगड

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.