PCMC jansavad sabha : जनसंवाद सभेत दाखल केलेल्या तक्रारींचा आयुक्तांनी आढावा घ्यावा – सचिन साठे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने दर आठवड्याला घेण्यात येणा-या जनसंवाद सभेत नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा आयुक्तांनी आढावा घ्यावा.(PCMC jansavad sabha) प्रशासनाच्या कामकाजाचा वेग वाढावा आणि नागरी समस्यांचा निपटारा व्हावा, यासाठी आयुक्तांनी संपूर्ण शहराचा प्रभागनिहाय दौरा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह सचिव सचिन साठे यांनी केली.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात साठे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट आहे. तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दर सोमवारी सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभांचे आयोजन सुरु केले आहे. पाटील यांच्यानंतर आलेले आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी देखील जनसंवाद सभा सुरु ठेवली आहे. या जनसंवादसभांमध्ये आतापर्यंत नागरिकांनी हजारो नागरी समस्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत.

Fort making competition : शिवमुद्रा युवा मंच आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

या प्रशासकीय काळात अनेक विकासकामे ठप्प झाली असून प्रशासन सुस्त झाले आहे. प्रशासनाच्या कामकाजाचा वेग वाढावा आणि नागरी समस्यांचा निपटारा व्हावा, यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संपूर्ण शहराचा प्रभागनिहाय दौरा करावा.(PCMC jansavad sabha) आतापर्यंत जनसंवाद सभांमध्ये दाखल झालेल्या नागरी समस्यांचा आढावा घेऊन आकडेवारी जाहिर करावी. तसेच सुस्त झालेल्या प्रशासनाला गतीशील आणि कृतीशील करुन नागरिकांना दिलासा द्यावा.

शहर कार्याध्यक्ष ॲड. अनिरुध्द कांबळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस माजी सरचिटणीस मयुर जयस्वाल, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव गौरव चौधरी, मकरध्वज यादव  यांच्या समवेत आयुक्तांना लेखी पत्र दिले. यावेळी आयुक्तांनी देखील साठे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

सुस्त प्रशासनाला पळवा

शहरात पाणीपुरवठा, रस्त्यांची व सिमेंट रस्त्यांची विकासकामे, वाहतुक समस्या, पदपथ, पथदिवे, ड्रेनेज, उद्यान, मनपा शाळा, अतिक्रमणे अशी अनेक विकासकामे प्रलंबित आहेत.(PCMC jansavad sabha) यावेळी शहरातील विविध विकासकामांचा आयुक्तांनी पाहणी दौरा करावा. आपण स्वतः देखील जनसंवाद सभांमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घ्या. लोकप्रिनिधींकडून अपेक्षित असणारा शहराचा विकास झाला नाही, प्रशासक राजवटीत प्रशासन सुस्त झाले आहे. या प्रशासनाला वेग देवून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही साठे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.