Bank Deputy Manager Fraud : बँकेच्या डेप्यूटी मॅनेजरनेच पळवले तब्बल दोन कोटी

एमपीसी न्यूज – कुंपणच शेत खाते या म्हणीप्रमाणे (Bank Deputy Manager Fraud) बँकेच्या डेप्यूटी मॅनेजरनेच आपल्या पदाचा गैरवापर करत बँकेतून तब्बल दोन कोटी रुपये पळवले. मात्र, पोलिसांनी पुण्यातील कॅम्प परिसरात मॅनेजर व त्याच्या साथीदारांना रकमेसह अटक केले आहे. ही रक्कम होती, मंचर येथील बँक ऑफ महाराष्ट्र करंन्सी चेस्ट यांची. धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम बँकेला रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या जवळच्या 26 शाखा व इतर बँकांना पुरवठा कऱण्यासाठी दिली होती.

ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 यांच्या पथकाने केली आहे. पथकाला सुरुवातील गोपनीय माहिती मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून बनावट नोटा घेऊन काहीजण पुण्यातील कॅम्प परिसरातील एस.जी.एस मॉल परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे कार आली, पण ती न थांबता पुढे जाऊन सोमजी पेट्रोलपंप जवळील वेलस्ली रोडवर थांबली. पोलिसांनी कारला घेराव घालून कारमधील अमोल गोरखनाथ कंचार (वय 45 रा. औरंगाबाद), संतोष वैजनाथ महाजन (वय 43 रा.नाशिक) व सुशिल सुरेश रावले (वय 34 रा.मंचर) यांना ताब्यात घेत कारची झडती घेतली. यावेळी पोलिसांना 2 कोटी रुपयांच्या 500 व 2 हजारांच्या नोटा तर मिळाल्या, पण त्या खऱ्याखुऱ्या चलनातल्या! पोलीसही यावेळी चक्राऊन गेले. त्यांनी संशयींताना याबाबत विचारणा केली. त्यांनी सुरुवातील उडवा-उडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांच्या खाक्यासमोर त्यांनी अखेर कबूल केले.

Fort making competition : शिवमुद्रा युवा मंच आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

यातील सुशिल रावले हा बँक ऑफ महाराष्ट्र मंचर करन्सी चेस्ट येथे (Bank Deputy Manager Fraud) डेप्युटी मॅनेजर असून त्याने पदाचा गैरवापर करून अनधिकृतपणे ही रक्कम बँकेतून आणल्याचे कबुल केले. पुढे त्यांनी सांगितले, की आरोपी अमोल कंचार याची कंचार फाऊंडेशन ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ही रक्कम आरोपी हे एका मोठ्या कंपनीला देणार होते. जी कंपनी पुढे त्यांना याच्या कितीतरीपट जास्त रक्कम ट्रस्टच्या खात्यावर आरटीजीएस मार्फत डोनेशन स्वरूपात देणार होती. ज्यातून कंचार हा शिक्षस संस्था उभारणार होता. तर, उरलेली जास्तीची रक्कम ते वाटून घेणार होते. यात संतोष महाजन हा कंचारला मदत करत होता. त्यामुळे कंचार हा डोनेशनचा काही भाग, तसेच शिक्षण संस्थेच्या बांधकामाचा ठेका असे महाजनलाच देणार होता.

मात्र, त्या आधी कंपनीला दोन कोटी देणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी सुशिलच्या मदतीने बँकेतून 2 कोटी घेतले. पुढे ट्रस्टच्या खात्यात डोनेशन येताच त्यातील 2 कोटी रुपये हे बँक ऑफ महाराष्ट्र मंचर करन्सी चेस्टमध्ये भरणार होते. मात्र, वेळीच पीतळ उघडे पडल्याने आरोपींचा पूर्ण डाव फसला व बँकेची मोठी रक्कम देखील वाचली. पोलिसांनी बँकेशी संपर्क साधला असता सुशील तेथे डेप्युटी मॅनेजर पदावर असून त्याने पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी सुशील व त्याच्या दोन साथीदरांवार मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.