Pune : 101 कोटींसाठी अजित पवार गेले अमित शहांच्या भेटीला

एमपीसी न्यूज – नोटबंदी नंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा (Pune) स्वीकारण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नकार दिला. त्यामुळे राज्यातील सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सुमारे 101 कोटी रुपये अडकून पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याची मागणी केली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

नोटबंदीनंतर राज्यातील सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सुमारे 101 कोटी रुपये अडकून पडले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) दैनंदिन व्यवहारातील जमा झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या 22 कोटी 25 लाख रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास ‘आरबीआय’ने नकार दिला होता. त्यामुळे बँकेने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

Chinchwad : स्त्री जीवनातील विविध भूमिकांवर प्रकाश टाकत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता

हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. आता यातून मार्ग काढण्यासाठी शहा यांच्याशी चर्चा  (Pune) सुरू झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह बँकांचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. यातून मार्ग काढण्याबाबत शहा यांना विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, मोदी सरकारने अचानक 500 आणि 1 हजार रुपये नोटबंदी केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी या नोटा बदलण्यासाठी बँकांत मोठी गर्दी केली होती. त्यावर विरोधी पाक्षांनी टीका केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.