Chinchwad : एस बी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पीसीईटी एस बी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे (Chinchwad) स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. ‘अतुल्य भारत’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एएमसीचे निवृत्त अधिकारी राजेंद्र मोरे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य संदीप पाटील, पीसीईटी प्रशिक्षण, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ शितलकुमार रवंदळे, पीसीईटी सदस्य उद्योजक अजिंक्य काळभोर, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती गवसने, विज्ञान समन्वयक कल्याणी भोंडवे, पीटीए सदस्य दिनेश लिंगवत, वाणिज्य समन्वयक शरणप्पा औसेकर आदी उपस्थित होते.

Pune : 101 कोटींसाठी अजित पवार गेले अमित शहांच्या भेटीला

स्नेहसंमेलनात विद्यार्थी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.