Thergaon Bank : प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेवर प्रेरणा सहकार पॅनलचे वर्चस्व, सर्व उमेदवार विजयी

एमपीसी न्यूज – थेरगावातील प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Thergaon Bank) 2022 ते 2027 संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रेरणा सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व 10 उमेदवार निवडून आले. नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे आज (सोमवारी) मतमोजणी झाली.

प्रेरणा को-ऑप. बँक लि.ची संचालक मंडळाकरीता सर्वसाधारण मतदार संघातील 10 जागांसाठी निवडणूक संपन्न झाली. निवडणुकीकरीता 11 उमेदवार रिंगणात होते. तुकारामभाऊ गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन कांतीलाल गुजर यांच्या नेतृत्वाखाली तुकारामभाऊ गुजर, कांतीलाल गुजर, श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, सुरेश पारखी, संजय पठारे, संतोष मुंगसे, ॲड.अजितकुमार जाधव, नाना शिवले, सी. ए. नंदकिशोर तोष्णीवाल हे प्रेरणा सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व 10 उमेदवार निवडून आले.

तुकाराम भाऊ गुजर यांच्या विचारांचे राखीव मतदारसंघातील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अक्षय गुजर (इतर मागास प्रतिनिधी), राजेंद्र शिरसाठ (भटक्या जाती जमाती), राजाराम रंदिल (अनुसूचित जाती जमाती), सुजाता पारखी व चंद्रभागा भिसे (महिला प्रतिनिधी) यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण साकोरे यांनी काम पाहिले.

मतांची आकडेवारी : Thergaon Bank
1. बारणे अक्षय आनंदा (135)
2. गुजर कांतीलाल तुकाराम (3252)
3. गुजर तुकाराम लक्ष्मणराव (3265)
4. जाधव अजितकुमार दिनकर (3240)
5. मुंगसे संतोष वासुदेव (3249)
6. पठारे संजय संतुराम (3273)
7. पारखी सुरेश नानाभाऊ (3239)
8. शिवले जगन्नाथ (नाना) कोंडीबा (3235)
9. तोष्णीवाल नंदकिशोर जमनालाल (3225)
10. वाकडकर गबाजी भिवाजी (3239)
11. वाल्हेकर श्रीधर धोंडीराम (3206)

एकूण वैध मतपत्रिका संख्या :- 3315
एकूण अवैध मतपत्रिका संख्या : 51

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.