Nigdi news : निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल जवळील रस्ता घेणार मोकळा श्वास

एमपीसी न्यूज : निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल (Nigdi news)जवळील रस्त्यावर लागणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या हातगाड्या पिंपरी-चिंचवड मनपा उद्या मधुकर पवळे उड्डानपुलाखाली हलवणार आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांनी दिली आहे.

त्या म्हणाल्या की, “मनपा मार्फत उड्डाणपुलाखाली पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम चालू आहे. आज हे काम संपल्यावर हातगाड्यांना तेथे हलविण्यात येईल.

निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल जवळील रस्त्यावर लागणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या हातगाड्यामुळे व वाहने पार्किंग मुळे पादचार्‍यांचा जीव धोक्यात — अशी बातमी एमपीसी न्यूजने  9 नोव्हेंबरला केली होती.

पुणे – मुंबई महामार्गवरील टिळक चौकला लागून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे संत तुकाराम व्यापारी संकुल आहे. त्याच्या शेजारीच टिळक चौकातून भेळ चौक कडे रस्ता जातो. या रस्तावर व्यापारी संकुला बाहेर अनेक खाद्य पदार्थांच्या हातगाड्या पहाटेपासून रात्री उशिरा पर्यंत लागलेल्या असतात. या हात गाड्यांवरील खाद्य पदार्थ खाण्यासाठी निगडी व आकुर्डी परिसरातील कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक येत असतात. हे खवय्ये त्यांच्या दुचाकी वाहने या हात गाड्यांच्या समोर रस्त्यावर लावतात. त्यामुळे मुलांना, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना तसेच मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. यामुळे पादचाऱ्यांना वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता आहे.

Thergaon Bank : प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेवर प्रेरणा सहकार पॅनलचे वर्चस्व, सर्व उमेदवार विजयी

या हातगाडीवाल्यांना मनपाने टिळक चौकतील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली जागा दिली होती. काही काळ ते तेथे गेले पण परत तेथून ते मुळ जागी आले आहेत.

याबाबत चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिकांना संघ म्हणाले की, “हा एक निगडी मधील ज्वलंत प्रश्न आहे. हातगाडीवाले व त्यांच्या ग्राहकांच्या अवैध वाहन पार्किंग मुळे पादचारी रस्त्याच्या मधून जीव मुठीत धरून चालतात. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते.(Nigdi news) टिळक चौकातील सिग्नल सुटला की वाहने भरधावं वेगाने येतात त्यामुळे अपघात होऊन पादचारी गंभीर जखमी होऊ शकतात किंवा कोणाचा जीव ही जाऊ शकतो.”

जोशी पुढे म्हणाले की, “हातगाडीवाले त्यांचे उरलेले खाद्य पदार्थ रस्त्यावरच टाकतात त्यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच त्यामुळे भटकी कुत्री तेथे हे फेकलेले अन्न खाण्यासाठी येतात. हातगाड्यांवरील खाद्य पदार्थ खाण्यासाठी येणारे बरेच ग्राहक धूम्रपान करतात त्यामुळे पादचाऱ्यांना प्रदूषित वायूचा त्रास सहन करावा लागतो.”

जोशी यांनी मागणी केली की पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हौकर्स झोन निर्माण करावेत. संत तुकाराम व्यापारी संकुल जवळील अनधिकृत हातगाड्यांना हटवून त्यांना हौकर्स झोनमध्ये हलवावेत. त्यांच्याकडून कमी डिपॉजिट व भाडे आकारावे. त्यामुळे हातगाडीवाले तेथे जातील व त्यांचा व्यावसाय करतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.