New Sangavi : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – रागाने बघितले या किरकोळ (New Sangavi) कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी ( दि.8) नवी सांगवी येथे पोळी भाजी केंद्रावर घडला.
या प्रकरणी प्रणित लक्ष्मण जाधव (वय 23 नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.9) फिर्याद दिली असून पोलिसांनी पियुष विजय शेळके (वय 20 रा. पिंपळे गुरव) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र ओंकार घोगरे याचे नवी सांगवीत (New Sangavi) ओंकार पोळी भाजी केंद्र आहे. तिथे फिर्यादी उभे असताना फिर्यादीच्या तोंड ओळखीचा आरोपी हा त्यांच्याकडे रागाने बघत होता. यावेळी फिर्यादी  माझ्याकडे रागाने का बघतो? असे विचारले असता आरोपीने माझ्या नादाला लागायचं नाही, तुला खल्लास करून टाकीन म्हणत त्याने कमरेला पाठी लावलेला कोयता काढून पाठीवर व डोक्यावर वार करत जखमी केले. सांगवी पोलीस याचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.