Pimpri : कामगाराने केला तीन लाखांच्या दागिन्यांचा अपहार

एमपीसी न्यूज –   सराफ दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातील तीन लाख १३ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार (Pimpri) केला. याप्रकरणी कामगाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना २८ मार्च रोजी सकाळी डिलक्स चौक, पिंपरी येथे ओंकार सराफ अँड ज्वेलर्स या दुकानात घडली.

अक्षय अशोक पोतदार (वय ३५, रा. भोसरी. मूळ रा. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार प्रताप जाधव (वय ३८, रा. वाकड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : अज्ञात चोरट्याने केले पाच ग्रॅम वजनाचे दागिने लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांचे डिलक्स चौक, पिंपरी येथे ओंकार सराफ अँड ज्वेलर्स हे दुकान आहे. दुकानात आरोपी अक्षय हा सेल्समन म्हणून काम करत होता. त्याच्याकडे जाधव यांनी विश्वासाने दुकानाच्या व कॅश काउंटरच्या चाव्या सोपवल्या होत्या. त्याचा गैरफायदा घेऊन अक्षय याने कॅश काउंटरच्या ड्रॉवर मधून 48.720 ग्रॅम वजनाचे तीन लाख 17  हजार 333 रुपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार (Pimpri) केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.