Nigdi : तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने एका तरुणाला गुंतवणूक करण्यास सांगत त्याची १० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली.

आकाश सत्यवान शेटे (वय 30, रा. आंबेगाव), सचिन एकनाथ नरवडे (वय 37, रा. मोशी), तुषार टेके आणि दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभम सोनावणे (वय 28 रा. चऱ्होली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : कामगाराने केला तीन लाखांच्या दागिन्यांचा अपहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोनावणे यांना फसवण्याचा उद्देशाने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले. त्याबदल्यात त्यांना खोट्या नोटा देऊन त्यांचा विश्वासघात करत फसवणूक केली. पोलिसांनी आकाश शेटे आणि सचिन नरवडे यांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.