Bremen chowk : ब्रेमेन मैत्री प्रतिकास तसेच ब्रेमेन चौक नामकरणास 25 वर्ष पूर्ण

एमपीसी न्यूज – ब्रेमेन मैत्री प्रतिकास तसेच ब्रेमेन चौक नामकरणास रविवारी (दि.13)  रोजी पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्या निमित्याने ब्रेमेन चौकातील मैत्री प्रतिकास (Bremen chowk) फुले आणि रंगीत फुग्यांनी सजवण्यात आले होते.औंध येथील स्पायसर शाळेच्या विद्यार्थीनींनी भारत आणि जर्मनी देशाच्या ध्वजांचे संकलन केल. मान्यवरांच्या हस्ते शांतता आणि मैत्रीचं प्रतिक असलेल्या कबुतरांना निसर्गात सोडून देण्यात आले.  

या प्रसंगी स्पायसर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीवन अरसूड आणि विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे डॉ. फ्रँक्लिन साम्राज, उप महापौर सुनीता वाडेकर, मॅक्स मुल्लर भवन च्या मिरिअम ब्रून्स, आयोजक  मायकेल वायदंडे, माजी महापौर दत्ता गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

रौप्य महोत्सवाचे निमित्य साधून या नंतरच्या झालेल्या छोटेखानी समारंभात पुणे-ब्रेमेन सॉलिडॅरीटी फोरम च्या  पुनर्स्थापनेची घोषणा करण्यात आली. सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरवात जर्मन भाषेच्या आठ ते बारा वयोगटातील विद्यार्थ्यांनी डॉ. विनीता महाजनी अनुवादित मनाच्या श्लोकांचे आधी मराठी आणि नंतर जर्मन भाषेतून सामूहिक पठण करून केली.(Bremen chowk) त्या नंतर कार्यक्रमाचे आयोजक आणि पुणे – ब्रेमेन सॉलिडॅरीटी फोरम चे नवनिर्वाचित अध्यक्ष मायकेल वायदंडे यांनी प्रास्ताविकात पुणे-ब्रेमेन सॉलिडॅरीटी फोरम स्थापण्या मागचा इतिहास आणि त्याचे कार्य, धोरण स्पष्ट केले. ते म्हणाले, पुणे आणि जर्मनी मधील ब्रेमेन या भगिनी शहरांची मैत्री पुढील पिढीच्या उज्वल भविष्य आणि विकासाचे उद्दीष्ट ठेवून करण्यात आली होती.

Pune crime : मार्केट यार्ड येथे भरदिवसा गोळीबार करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

काही कारणास्तव पुणे – ब्रेमेन सॉलिडॅरीटी फोरम बरखास्त झाल्यावर आता स्पायसर विद्यापीठ, फोरमचे  माजी अध्यक्ष गुंथर हेल्गिस आणि आत्ताच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि विकास अधिकारी एनेटा लँग यांच्या सहकार्याने पुन्हा नव्याने फोरमची  स्थापना करण्यात आली आहॆ.(Bremen chowk) या वेळी सॅमसन वायदंडे यांनी तयार केलेल्या पुणे-ब्रेमेन मैत्री आणि  कार्याच्या ध्वनीचित्रफितीचे प्रसारण करण्यात आले. ग्रामीण भागात जाऊन जर्मन भाषा शिकवणाऱ्या चक्र डुस्मेंटा, श्रुती बापट, मुग्धा देशपांडे, मयुरी खळदकर, आशी नाईक आणि साकेत ढेकणे या शिक्षकांचा सत्कार मिरिअम ब्रुन्स यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमात पुणे महानगरपालिका आणि स्पायसर विद्यापीठाने संयुक्तरित्या गुंथर हिल्गिस यांना विशेष उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी जीवन गौरव पुरस्कार दिला जो हिल्गिस यांच्या वतीने मिरिअम ब्रून्स यांनी स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शॉनेन आणि दिव्या वाघ यांनी केले. डेव्हिड वायदंडे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.