Dehu road accident: दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरून झालेल्या(Dehu road accident) अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी अमरजाई देवी मंदिराजवळ, देहूरोड येथे घडली.

ओंकार सुभाष बनकर (वय 23, रा. चाकण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन उत्तम खाडे (वय 23, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी सहप्रवासी तरुणाचे नाव आहे.

Wildlife Protector Maval: पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कावळ्याला केले रेस्कयू 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि त्यांचा मित्र ओंकार बनकर दोघेजण पल्सर दुचाकीवरून मावळ मधून पिंपरीकडे जात होते. अमरजाई मंदिराजवळ असलेल्या वळणावर ओंकारने दुचाकींचा अचानक ब्रेक लावला आणि दुचाकी घसरली.(Dehu road accident) यामध्ये सचिन यांच्या कमरेला मुकामार लागला. तर ओंकार याच्या डोक्याला, पोटाला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.