Wildlife Protector Maval: पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कावळ्याला केले रेस्क्यू 

एमपीसी न्यूज: एका झाडावर पतंगाच्या मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याची कामशेत येथे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने सुटका केली आहे.(Wildlife Protector Maval) या कावळ्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करून निसर्गात सोडण्यात आले.

26ऑगस्टला सकाळी कामशेत येथे एका झाडावर पतंगाच्या मांज्या मध्ये एक कावळा अडकला आहे. अशी महिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे,(Wildlife Protector Maval) जिगर सोळंकी व इतर सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तेथे कावळ्याला सुरक्षितपणे रेस्क्यु केले. त्यानंतर पुणे वन विभागाच्या वडगाव वन विभाग चे वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना कळवले.

Pimpri accident: कारच्या धडकेत तरुण जखमी

जिगर सोलंकी यांनी लोकांमध्ये जन जागृती केली. ते म्हणाले की, कावळा एक निसर्गाचा भाग असून आपण त्याला निसर्गामध्ये राहू दिले पाहीजे. असे सांगुन त्या कावळ्याची प्राथमिक तपासणी केली. त्या कावळ्याची एका पायाची दोन बोटे (नखे) कट झाल्याचे दिसुन आले.(Wildlife Protector Maval) इतर काही जखम नसल्यामुळे त्या कावळ्याला वन विभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य यांनी लगेच निसर्गात सोडुन दिले. तसेच कुठेही वन्य प्रणी साप किंवा कुठलेही प्राणी घरात किंवा लोक वस्ती मध्ये दिसल्यास पुणे वन विभाग पुणे टोल फ्री नंबर (1926) सर्प मित्र यांना फोन करा काही वेळात आपल्याला नक्कीच मदत मळेल. असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश संपतराव गराडे यांनी केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.