Charholi Fraud: एटीएम कार्डद्वारे पेट्रोल भरणे पडले महागात, नागरिकाची पावणे तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : एटीएम कार्डद्वारे पेट्रोल भरणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. पेमेंटसाठी दिलेल्या कार्डचा पिन नंबर घेऊन त्यांनतर कार्डची अदलाबदली केली.(Charholi Fraud) त्याद्वारे एटीएम द्वारे दोन लाख 80 हजार 580 रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार 6 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट रोजी फुलगाव आणि च-होली बुद्रुक येथे घडला.

प्रकाश गुलाब तापकीर (वय 62 , रा. च-होली गावठाण) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 27) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehu road accident: दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबनावे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेल्यानंतर तिथे काम करणा-या एका अनोळखी कामगाराने फिर्यादी यांचे एटीएम कार्ड घेतले.(Charholi Fraud) त्याचा गोपनीय पिन विचारून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यांनतर अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून दोन लाख 80 हजार 580 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. 18 ऑगस्ट रोजी फिर्यादी च-होली येथील बँकेत गेले असता हा प्रकार उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.