Lions Club : लायन्स क्लब भोजापुर गोल्डच्या अध्यक्षपदी जयश्री साठे यांची निवड

एमपीसी न्यूज : माजी प्रांतपाल (डिस्ट्रिक्ट डी 1 सातारा) एमजेएफ लायन जगदीश पुरोहित यांनी अध्यक्ष व त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला (Lions Club) आज शपथ दिली. ला. त्रुप्ती शर्मा यांची सचिवपदी तर, ला. शोभा फटांगडे यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी वेदांतातार्य ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी) हे उपस्थित होते. रिजन चेअरमन अनिल जोपे व जोन चेअरमन सुदाम भोरे तसेच जेष्ठ कवयत्री संगीता जिंजुरके व ख्यातनाम कवी भरत दौंडकर हे विशेष अतिथी होते.

आरोग्य शैक्षणिक साहित्यिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या नामवंत क्लबच्या माध्यमातून वर्षभर अनेक सेवाकार्य केली जातात. पदग्रहणाच्या निमित्ताने भोसरी पोलीस स्टेशनच्या विनंतीनुसार भोसरीच्या उड्डाणपुलाखाली क्लबच्या वतीने कायमस्वरूपी प्रोजेक्ट म्हणून 14 CCTV कॅमेरासंच बसवण्यात आले. तसेच, आळंदी येथील वारकरी मुलांना मधुकरी मागण्यासाठी 3 सायकली भेट देण्यात आल्या. तसेच, जिल्हा परिषद शाळा नरकेवाडी येथील गरीब व गरजू 64 विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढी शैक्षणिक मदत केली.

तसेच, घरकाम करणाऱ्या गरीब विद्यार्थिनीला शालेय मदत आणि आळंदी येथील वेदांतभवनास बांधकाम निधी म्हणून भरीव मदत केली. या सर्व सेवाकार्यासाठी डॉ. विलास साबळे, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. सुहास कांबळे, मुरलीधर साठे, जयश्री साठे, शोभा फटांगडे, तृप्ती शर्मा, प्रा. शंकर देवरे, प्रा. दिगंबर ढोकले यांनी आर्थिक मदत केली.

अध्यक्ष जयश्री साठे (Lions Club ) यांनी वर्षभर करण्यात येणाऱ्या कामाचा लेखाजोखा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आदिवासी व दुर्गम भागातील लोकांसाठी वस्त्रदान मोहीम, ग्रामीण भागातील महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर व स्वयंरोजगार कार्यशाळा तसेच वृक्षलागवड व त्यांचे जतन कार्यक्रम तसेच निराधार गरीब मुलांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करण्याचा मानस व्यक्त केला.

या प्रसंगी लिओ क्लबचा पदग्रहण सोहळाही संपन्न झाला. लिओ स्म्रुती शर्मा व तिच्या टीमला देखील या वेळी पदांची दीक्षा दिली गेली. यावेळी अध्यक्ष लिओ स्मुर्तीने ग्रामीण भागात एक रोबोटिक लॅब चालू करण्याचा मनोदय व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले आणि ला. मुकुंद आवटे यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन लिओ स्मुर्ती हिने केले.

Charholi Fraud: एटीएम कार्डद्वारे पेट्रोल भरणे पडले महागात, नागरिकाची पावणे तीन लाखांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.