Khadki Cantonment Area : साखर वाटप करून वंदे मातरम संघटनेचे अनोखे आंदोलन

एमपीसी न्यूज : वाहन चालकांना (Khadki Cantonment Area) साखर वाटप करून वंदे मातरम संघटनेने खडकी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात खडकीमध्ये आज दुपारी अनोखे निषेध आंदोलन केले.

Lions Club : लायन्स क्लब भोजापुर गोल्डच्या अध्यक्षपदी जयश्री साठे यांची निवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, एमएसईबी ऑफिस चौक ते ऑल सेंट्स हायस्कूल चौक व इतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहन चालक व स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी वंदे मातरम संघटनेने आज हे निषेध आंदोलन केले.

वंदे मातरम संघटनेचे खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच म्हणाले, की “ऑगस्टमध्ये सुरुवातीस झालेल्या पावसामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले. यामुळे वाहन चालकांना व स्थानिकांना या खड्डेमय रस्त्यांवरून जाताना खूप त्रास सहन करावा लागला. या विषयी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाने रस्त्यांवरील खड्डे बुजवले.”

ते पुढे म्हणाले की, “त्यानंतर (Khadki Cantonment Area)परत जोरदार पाऊस झाल्याने सर्व रस्त्यांवर परत खड्डे निर्माण झाले. यावरून असे दिसते की बोर्डाने जे खड्डे बुजवण्याचे काम केले ते निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे वंदे मातरम संघटनेच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आजचे हे आंदोलन मेथोडीस्ट चर्च जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर करण्यात आले आहे. वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध निषेधाचा फलक लावून तेथे रांगोळी काढण्यात आली होती. त्यांनी तेथे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विरोधात घोषणा दिल्या.

तसेच, त्यांनी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना सुखरूपपणे रस्त्यावरून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी साखर देऊन कॅन्टोन्मेंट बोर्ड विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्वरित खड्डे बुजविले नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वंदे मातरम संघटनेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.