Dehugaon Crime News :देहुगाव येथील हार्डवेअरच्या दुकानातून सुमारे दोन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – देहुगाव येथील रामा ट्रेडर्स नावाच्या हार्डवेअरच्या दुकानाचे शटर उचकटून (Dehugaon Crime News) चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.ही चोरी बुधवारी (दि.4) रात्री ते गुरुवारी (दि.5) पहाटे या कालावधीत घडली आहे.

 

याप्रकरणी अशोक मधुकर हाटवटे (वय 27 रा. देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Pune Cirme News : बांधकाम व्यावसायिकाकडून उकळली 26 लाखांची खंडणी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे देहुगाव बायपास रोडवर रामा ट्रेडर्स नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून लाकडी रॅकवर ठेवलेले 1 लाख 91 हजार 600 रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे सॅनेटरी वेअर, सीपी फिटींग साहित्य चोरून नेले आहे. यावरून देहुरोड पोलीस टाण्यात (Dehugaon Crime News) गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.