Delhi news: उद्योजकांना सीएम फंडात मदत करण्यास रोखणे राज्य सरकारवर अन्यायकारक; श्रीरंग बारणे यांनी उठविला लोकसभेत आवाज

राज्यातील उद्योगपतींनी सीएसआर निधी सीएम फंडास द्यावा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती, कंपन्यांनी सीएसआरअंतर्गत पीएम केअर फंडात निधी दिला आहे. उद्योगपती पीएम केअर फंडाकरिता निधी देवू शकतात. परंतु, ज्या राज्यात आपला उद्योग सुरु आहे. त्या राज्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सीएसआर फंड जमू करू शकत नाहीत, हे राज्यासाठी अन्यायकारक आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. राज्यातील उद्योगपतींना त्यांचा सीएसआर निधी सीएम फंडास देण्याची मूभा द्यावी. केंद्र सरकारमार्फत पीएम केअर फंडातून राज्य सरकारला मदत करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

पीएम केअर फंडात सीएसआर अंतर्गत किती निधी जमा झाला, याची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

खासदार बारणे म्हणाले, जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. भारत देश पण त्याचा सामना करत आहे. मी ज्या राज्यातून येतो, त्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या महामारीच्या काळात राज्यातील उद्योगपती, कंपन्याच्या माध्यमातून पंतप्रधान केअर फंडात किती सीएसआर निधी जमा झाला, याची माहिती मिळत नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती, कंपन्यांनी पीएम केअरमध्ये सीएसआर निधी जमा केला आहे.

उद्योगपती पीएम केअर फंडासाठी सीएसआर देवू शकतात. परंतु, ते मुख्यमंत्री सहाय्याता निधीत सीएसआर फंड जमा करू शकत नाहीत, हे राज्यासाठी अन्यायकारक आहे. जे उद्योजक ज्या राज्यात उद्योग करतात, त्या राज्याचे ते काहीतरी देणे लागतात.

उद्योजकांनी पीएम फंडाऐवजी सीएम फंडाकरिता जर सीएसआर निधी दिला असता तर कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला मोठी मदत झाली असती.

कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सरकारसोबत आहे. त्यामुळे राज्यावर अन्याय न करता केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला मदत करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.