Pimpri : पवना नदीवर नवीन  रावेत बंधारा बांधण्याची मागणी 

एमपीसी  न्यूज – शहरासाठी  पाणी उचलत असलेल्या पवना नदीवरील  नवीन रावेत बंधारा बंधावा , अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  नविन  बांधणेबाबत नुकताच पावसाळा संपलेला आहे. पवना धरण १०० टक्के भरलेले आहे. तरी सुध्दा शहरामध्ये काही भागामध्ये  पाण्याची तीव्र टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. महापालिका शहरासाठी पाणी उचलत असलेल्या पवना नदीवरील रावेत बंधारा जुना झाला असून गाळाने पूर्ण भरलेला आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला दिलेल्या आदेशानुसार पावसाळ्याचे चार महिने रावेत येथील बंधाऱ्यापासून, तर उर्वरित आठ महिन्यांत जलवाहिनीतून पाणी घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे रावेतला बंधारा बांधावाच लागणार आहे. हा बंधारा ब्रिटीशकालीन  शंभर वर्षांपेक्षा जुना आहे. त्यामुळे रावेतचा बंधारा दुरुस्त होण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. त्यामुळे पुण्यातील कालवा ज्यापध्दतीने फुटून जी हानी झाली तशी वेळ पिंपरी चिंचवड शहरावर येऊ शकते. तो तीन ते साडेतीन मीटर उंचीचा असून, तेथे शहराचे सात-आठ दिवसाचे पाणी शिल्लक राहू शकते. परंतु त्यात गाळ साठलेला असल्यामुळे फक्त एक दिवसाचे पाणी त्यात साठू शकते. त्यामुळे धरणातून रोज पाणी बाराशे क्‍युसेक (घनफूट प्रतिसेकंद) सोडावे लागते. याचा अर्थ दररोज ५०० ते ५५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणातून सोडले जाते, तर महापालिका दररोज ४५० ते ४८० एमएलडी पाणी घेते. त्यामुळे दररोज सरासरी पाच कोटी लिटर पाणी वहनव्ययाद्वारे व गळतीमुळे  वाया जाते. त्यामुळे महापालिका शहरासाठी पाणी उचलत असलेल्या पवना नदीवरील रावेत बंधारा बांधण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दिलेली आहे .

तसेच तेथे नवीन बंधारा तातडीने बांधण्याचा आदेश पालकमंत्रीनी दिल्यानंतरही महापालिकेकडून त्यासाठी गांभीर्याने हालचाली सुरू झालेल्या नाहीत. सध्याचा बंधारा दुरुस्ती पलीकडे आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन आणि थोडा जास्त उंचीचा म्हणजे साडेचार मीटर उंचीचा बंधारा बांधल्यास त्यांचा पाणीसाठा वाढेल. तसेच नदीच्या सध्याच्या पात्राचा वापर करता येईल. आणखी भूसंपादनाची आवश्‍यकता नाही.शहरातील कृत्रिम पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रावेत येथील जुना गाळाने भरलेला बंधराच्या ठिकाणी नविन बंधारा युध्दपातळीवर बांधणेबाबत योग्य ते आदेश आपणांमार्फत निर्गत करावेत. व शहरातील नागरीकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागू नये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.