Ravet : अपंग महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – अपंग महिलेच्या घरात घुसून पुतण्याने लैंगिक अत्याचार केला. ही घटना शनिवारी (दि. 8) पहाटे रावेत (Ravet) येथे घडली.

Chikhali : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या एकावर गुन्हा

याप्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 22 वर्षीय आरोपी पुतण्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी पुतण्या हा फिर्यादी महिलेच्या घरी आला. त्याने जोरजोरात दरवाजा वाजून फिर्यादी यांना तुझ्याशी बोलायचे आहे. तू किचनमध्ये ये नाहीतर तुझ्या मुलीला मारून टाकेल, अशी धमकी दिली.

त्यानंतर फिर्यादी यांच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. फिर्यादी या अपंग असल्याने त्यास विरोध करू शकल्या नाहीत. त्याने फिर्यादी यांच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. रावेत (Ravet) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.