Hadapsar News: आधी कोर्ट मॅरेज केलं, नंतर विधीवत लग्न करताना हुंड्याची मागणी; हडपसर पोलिसात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: आधी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर विधीवत लग्न करण्यासाठी हुंड्याची मागणी करून (Demand for dowry) तरुणीला नांदवण्यास नकार देणाऱ्या नवरदेवासह चार जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या हडपसर परिसरातील एका तरुणीने तक्रार दिली आहे. पती निरंजन थोरले याच्यासह सासू-सासरे आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, निरंजन थोरले हा एका शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करतो. दक्षिण कोरियातील एका शहरात तो राहतो. निरंजन थोरले यांनी फिर्यादी तरुणीला आधी आपण कोर्ट मॅरेज करू आणि त्यानंतर विधिवत लग्न करू असं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी 18 ऑक्टोबर 2022 रोजी कोर्ट मॅरेज केले. यानंतर निरंजन याला पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया येथे जायचे होते.

हप्त्याच्या मागणीसाठी हॉटेलची तोडफोड; पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर घडली घटना

दरम्यान कोर्ट मॅरेज झाल्यानंतर पुन्हा विधिवत लग्न करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी तरुणीच्या कुटुंबीयांकडे हुंडा देण्याची मागणी केली. फिर्यादी या सासरी नांदण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांना घरात घेण्यास नकार दिला. या सर्व प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी हडपसर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.