Deuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 21 रुग्णांना डिस्चार्ज; 7 नवे कोरोना रुग्ण

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शुक्रवारी संकल्प नगरी व वृंदावन सोसायटी येथे प्रत्येकी 2, तर चिंचोली, शितलानगर नं. 1, वैशाली अपार्टमेंट येथे प्रत्येकी एक अशा एकूण 7 कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांची भर पडली. तसेच कोरोनाच्या उपचाराने बरे झालेल्या 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1062 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 7 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 1062 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 890 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 145 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सध्या 10 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 46 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 34 आणि हद्दीबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे.

तर पिंपरी चिंचवड महापालिका कोविड सेंटरमध्ये 2 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच पुणे रेल्वेच्या कोविड सेंटरमध्ये एका रूग्णावर उपचार सुरु आहेत.

होम आयसोलेशनमध्ये 98 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 27 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.