Dighi : कॅफे मधून भोंदू बाबा आला अन सोन्याची अंगठी घेऊन पसार झाला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीकडे ( Dighi ) एक भोंदू बाबा भगव्या कपड्यांमध्ये आला. त्याने कसलेतरी मंत्र म्हणून व्यक्तीला सोन्याची अंगठी काढायला लावली अन तो ती अंगठी घेऊन निघून गेला. ही घटना शनिवारी (दि. 23) दिघी येथे पुणे-आळंदी रस्त्यावर घडली.

पंकज भास्करराव डुकरे (वय 40, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dighi : बांधकाम साईटवर तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज हे पान खाण्यासाठी जात होते. त्यावेळी सनराईज कॅफेमधून भगव्या कपड्यामधील एक भाेंदू साधू पंकज यांच्या जवळ आला. त्याने तोंडातल्या तोंडात काहीतरी शब्द पुटपुटले.

त्यानंतर फिर्यादीच्या बोटातील 6 ग्रॅम वजनाची 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी त्याने काढून घेत निघून गेला. दिघी पोलीस तपास करीत ( Dighi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.