Dighi : बांधकाम साईटवर तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून (Dighi) खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 डिसेंबर रोजी दिघी येथे घडली.

अजय अक्षय बेहरा (वय 22, रा. दिघी. मूळ रा. ओडीसा) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश मते यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परमेश्वर रमेश बेहरा (वय 38, रा. दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : बेकरी चालविण्यासाठी मागितली खंडणी; स्वयंघोषित दादाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघीत कमलराज व्ही स्क्वेअर या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अजय हा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर प्लंबिंगचे काम करत होता.

त्यावेळी तो पार्किंगच्या स्लॅबवर पडून त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराने कामगाराला कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरवली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत (Dighi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.