Chakan : बेकरी चालविण्यासाठी मागितली खंडणी; स्वयंघोषित दादाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज –  माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल (Chakan) आहे. तुझी बेकरी चालवायची असेल तर 1500 रुपये हप्ता द्यावा लागेल. अन्यथा तुला कोयत्याने मारतो, अशी स्वयंघोषित दादाने एका बेकरी चालकाला धमकी दिली. बेकरी चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना शनिवारी (दि. 23) नेहरू चौक, चाकण येथे घडली.

Wakad : महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

विवेक ऊर्फ युड्या रामदास कुऱ्हाडे (रा. चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मोमीन अहमद अन्सारी (वय 30, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेकर्स ब्राऊन बेकरीत असताना आरोपी तेथे आला. तुझी बेकरी चालवायची असेल तर 1500 रुपये हप्ता द्यावा लागेल. पैसे नाही दिले तर तू बेकरी कशी चालवतो तेच मी बघतो. मी या भागाचा दादा आहे.

माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे, असे म्हणत आरोपीने बेकरीसमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून फिर्यादीला शिवीगाळ केली. मला हप्ता दिला नाही तर कोयत्याने मारहाण करतो, अशी धमकी आरोपीने दिली. चाकण पोलीस तपास करीत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.