Dighi : मोटारसायकल जाळल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – दोघांनी मिळून पार्क केलेल्या दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे शिवसाईनगर दिघी येथे घडली. प्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ज्ञानेश्वर उत्तम गुजर (वय 33), हरीश तुकाराम साबळे (दोघे रा. सावंतनगर, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मण माणिक शिंदे (वय 28, रा. शिवसाईनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीच्या दोन दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केल्या होत्या. आरोपींनी संगनमत करून दोन्ही दुचाकी जाळल्या. यामध्ये एकूण 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.