Pimpri: भाजी मंडईंच्या गाळ्यांची सोडत लांबणीवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांमधील तीन भाजी मंडईमधील गाळ्यांचा लिलाव व सोडतीचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. भूमी व जिंदगी विभागाच्या वतीने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध भागांमधील नागरिकांच्या सोयीकरिता भाजी मंडई उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी इंद्रायणीनगरमधील पेठ क्रमांक दोनमधील गाळ्यांचा लिलाव 7 मार्चला होणार होता. चिखली, पेठ क्रमांक 20 मधील मंडईतील गाळ्यांचा लिलाव 8 मार्चला तर वाकडमधील पेठ क्रमांक 39 मधील गाळ्यांचा लिलाव 11 मार्चला होणार होता.

त्याकरिता 18 फेब्रुवारी ते 5 मार्चदरम्यान पाच हजार रुपये अनमात रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव या तीनही ठिकाणच्या गाळ्यांचा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.