Pimpri: स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी भाजपाचा ‘व्हीप’ जारी

कोण होणार अध्यक्ष, अधिकृत की बंडखोर?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास मडिगेरी यांना मतदान करण्यासाठी भाजपने पक्षादेश (व्हीप) जारी केला आहे. व्हीपचे उल्लंघन केल्यास नगरसेवकपद रद्द होऊ शकते. त्यामुळे भाजप नगरसेवक पक्षाच्या अधिकृत की बंडखोर उमेदवाराला मतदान करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोण अध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज (गुरुवारी) दुपारी बारा वाजता निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे हे कामकाज पाहणार आहेत. स्थायी समितीत दहा भाजप, चार राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत.

भाजपने विलास मडिगेरी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तर, भाजपच्याच शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत आव्हान दिले आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदी अधिकृत उमेदवार असलेले मडिगेरी की बंडखोर शिंदे यांची निवड होते. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.