Dighi Crime News : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक; दोन किलो गांजासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेला गांजा पोलिसांनी जप्त केला. भारतनगर, भोसरी येथे शनिवारी (दि. 2) दुपारी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. दोन किलो 60 ग्रॅम गांजासह सहा लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सुजित सुभाष खुळे (वय 27, रा. मु. पो. फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक मयुर मधूकर वाडकर यांनी शनिवारी (दि. 2) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खुळे हा गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आळंदी रोड येथील भारतनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सापळा लावला. त्यावेळी कार मधून आलेल्या आरोपी खुळे याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो 60 ग्रॅम वजनाचा 51 हजार 500 रुपयांचा गांजा आढळला. पोलिसांनी गांजासह सहा लाखांची कार व इतर साहित्य असा एकूण सहा लाख 51 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.