Dighi Crime News : हॉटेलमध्ये झोपलेल्या तरुणांचे दोन मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये झोपलेल्या दोन तरुणांचे मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 19) पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास मॅगझीन चौक, दिघी येथे एका हॉटेलमध्ये घडली.

ज्ञानेश्वर सुधाकर खरात (वय 18, रा. मॅगझीन चौक, दिघी. मूळ रा. आळंदी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मॅगझीन चौक, दिघी येथे हॉटेल आहे. ते गुरुवारी त्यांच्या हॉटेलमध्ये झोपलेले असताना पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र हनुमान कामखेडे यांचा असे 21 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.