Talegaon-Dabhade : जिल्हा मध्यवर्ती बँक शेती विकास सोसायट्यांच्या माध्यमातून खरेदी करणार इंद्रायणी भात

एमपीसी न्युज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला इंद्रायणी भात शेती विकास सोसायट्यांच्या माध्यमातून खरेदी करणार आहे.(Talegaon-Dabhade) मावळ तालुका इंद्रायणी भात उत्पादनासाठी ओळखला जातो. इथले शेतकरी मिळेल त्या दराने जवळच्या बाजारपेठेत हा भात विकतात. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला असल्याची माहिती बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली.

मावळ तालुका हा खरीप भातपिकाचे आगार आहे.या तालुक्यात सुमारे 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपिक यावर्षी घेण्यात आलेले आहे.यावर्षी भातपिकाला पोषक असा पाऊस झालेला असल्याने शेतकरी  समाधानी आहेत. तर एकरी  उत्पादनही चांगलेच येणार असा विश्वास शेतकरी बांधवाकडून व्यक्त होत आहे.

Pune crime : बायको पळून गेली एकासोबत बदडले दुसऱ्यालाच; तिघांवर गुन्हा दाखल

दरवर्षी मावळ तालुक्यातील खरीप भातपिक उत्पादक शेतकरी आपल्या  शेतात पिकविलेला इंद्रायणी भात  आपल्याला लागतो तेवढा घरी ठेवून  बाकीचे भात कामशेट,पवनानगर, टाकवे,वडगाव,तळेगाव आदी बाजारपेठेत मिळेल तशा दराने  विकत असे.(Talegaon-Dabhade) यावर्षी प्रथमच सहकार महर्षी व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी  शेतकऱ्याने पिकविलेला भात, शेती  विकास सोसायट्याच्या मार्फत   विकत घेण्याची योजना हाती घेतली आहे. त्यासाठी  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भरीव अर्थ सहाय्य कॅश क्रेडिटच्या माध्यमातून  करणार आहे.

भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना  संबधित शेती सोसायटी त्याच दिवशी  “पेमेट” नजीकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेतुन करणार असल्याचे बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी  सांगितले.

या इंद्रायणी भाताचा खरेदी दर प्रति किलो 23 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. हा दर अतिशय चांगला असल्याने शेतकर्‍यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन श्री दाभाडे यांनी केले आहे.(Talegaon-Dabhade) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मावळ विभागाचे विभागीय अधिकारी गुलाबराव खांदवे,वसुली अधिकारी नीरज पवार याबाबत विशेष परिश्रम घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.