Pune crime : बायको पळून गेली एकासोबत बदडले दुसऱ्यालाच; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बायको पळून जाण्याला हाच जबाबदार आहे असा संशय मनात धरून एकाने तिघांसह शेजारी राहणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. खराडी परिसरात 27 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण तुकाराम रणपिसे (वय 32) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाची बायको फिर्यादीच्या मित्रासोबत पळून गेली आहे. फिर्यादीने त्या दोघांचे प्रेम संबंध जुळून दिले असावेत असा संशय पळून गेलेल्या पत्नीच्या पतीला होता. हाच राग मनात धरून तिघा जणांनी मिळून फिर्यादी यांना स्टीलच्या रॉडने मारहाण केली.

Bharti Vidyapeeth : हौसेसाठी गाड्या चोरणाऱ्याला अटक

फिर्यादीची काही भांडणे सोडवण्यासाठी आली असता आरोपींनी तिला देखील मारहाण केली. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.