Bharti Vidyapeeth : हौसेसाठी गाड्या चोरणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – हौसेसाठी दुचाकी (Bharti Vidyapeeth) चोरणाऱ्या सराईताला भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

शेखर चंद्रकांत चव्हाण (वय 34 रा.अमृतसिटी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात गस्त घालत असताना हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे,सचिन गाडे,अभिजीत जाधव यांना गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, एकजण संशयित रित्या बुलेटवर उभा असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे (Bharti Vidyapeeth) अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी चार अशा 2 लाख रुपयांच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस तपासात त्याच्यावरील भारती विद्यापीठ, हडपसर पोलीस ठाण्यात दोन व शिक्रापूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.