Lonikand : पुणे शहर पोलिस दलातील आणखी 3 पोलीस कर्मचारी निलंबित; वाघोली जळीतकांड प्रकरण भोवले

एमपीसी न्यूज : पुण्यातील वाघोली मधील जळीतकांड प्रकरण (Lonikand) लोणीकंद पोलिसांना चांगलेच भोवले आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या बदली नंतर आता लोणीकंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशोक घेगडे, कैलास उगडे आणि महेंद्र शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नावे आहेत. 

पुण्यात 2 दिवसांपूर्वी एका तरुणाने पोलीस कारवाई करत नसल्याने स्वतःवर डिझेल टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपींवर गुन्हा दखल केला. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

Lonikand : पुण्यातील लोणीकंद आणि हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची तडकाफडकी बदली

याप्रकरणी कर्तव्यात कसूरी केली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात (Lonikand) आले आहे. अवघ्या 2 दिवसात पुणे शहर पोलिस दलातील 8 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.